..

बापुंची वचने 1)अनिरुद्ध क्षेत्री जो आला शरण,तयासी कैसा भय दुःख भार 2)श्रद्धावान हाची माझा मित्र सखा,तयासी मी रक्षिन देवयान पंथी 3)ग्रंथराज हाची जयाचे अनुसंधान,तयाचा योगशेम मीची वाहे 4)जान मी न कधी टाकीन तुजसी,देईन नित्य मनः सामर्थ्य बल बुद्धि 5)मर्यादा हाची जयाचा तारक मार्ग,तयाचा मी आश्रय सर्वकाळ 6)जो जो मज स्मरे दृढ़भावे,तयासी आनंदघन देईन मी 7)मज सवे जो प्रेमे येइल,तयाचे अशक्य शक्य मी करीन 8)तू वानर मी मित्र तुझा खचित,रावण मरणार जान तू निश्चित 9)जेथ सेवा भक्ति शारन्य राहे,तेथ तेथ दाऊ नंदा अनिरुद्ध राहे

Wednesday, July 29, 2026

मनःसामर्थ्यदाता

साधेपणाच्या वस्त्रांमागे
दडले होते तेज अपार,
श्रद्धावानांच्या प्रत्येक वेदनेला
ज्याने मानला स्वतःचा भार।

सू्याहून तेजस्वी 
असा एक मनस्वी 
राम राज्याचा तपस्वी 
मनसामर्थयदाता ।

संकटात धीर देई 
अंधारात दीप होई 
जीवनाला दिशा देई 
मनसामर्थ्यदाता

अजानबाहू तेजपंज 
कल्पतरूसम छाया 
करुणामयी दिव्यता 
मनसामर्थ्यदाता ।

साधी राहणी, 
दिव्य तेज विस्तार 
भक्तांच्या वेदनांना मानला 
स्वतःचा भार ।

चित्तशक्तिदाता 
धैर्यप्रेरणदाता 
आत्मबलदाता 
मनसामर्थ्यदाता

अंतरी रामनाम 
ओठी अमृतवाणी 
हृदयात वसतो
मनःसामर्थ्यदाता
 
नीतिमार्ग-दाविता
सद्बुद्धि-प्रकटते
कर्मप्रेरणदाता
मनसामर्थ्यदाता ॥

अंतःप्रेरणदाता
श्रद्धाजागृतीदाता
संकल्पसिद्धिदाता
मनसामर्थ्यदाता ॥

@ABHI
गुरुपौर्णिमा २९ जुलै २०२६